
Madha Flood
Sakal
माढा : माढा तालुक्यातील वाकाव गावातील सिना नदीला आलेल्या पुराने संपूर्ण वाकाव गावाला वेढा घातला. गावातील प्रत्येक घर, प्रत्येक रस्ता पाण्याखाली गेला होता. अशा बिकट परिस्थितीत एका गरोदर महिलेचे प्राण वाचवणे हे खरे तर गावकऱ्यांसाठी मोठे आव्हान होते. नातलग आणि शेजारच्या ग्रामस्थांच्या जिद्दीमुळे अश्विनी खैरे नावाच्या नऊ महिन्याच्या गरोदर महिला मंगळवारी (ता. २३)सुखरूपपणे दवाखान्यात पोहोचली आहे.