माढा, (जि. सोलापूर) - मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर जिथे यश शक्य वाटत नाही, तिथेही मार्ग निघतो हे वाक्य माढ्यातील राऊत कुटुंबाने सत्यात उतरवले असून आई-वडील दोघांनी माढ्याचे सरपंचपद भूषविले असून एक मुलगी सी. ए., मुलगा सहाय्यक निबंधक तर दुसरी मुलगी महसूल सहाय्यक झालेली आहे. एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी ही राऊत कुटुंबाची सत्य कहाणी आहे.