

Grand Welcome of Shambhu Mahadev Kavad Kathi in Madha
sakal
माढा : श्नी शंभू महादेवाच्या कावड काठींचे माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये भक्तिपूर्वक व उत्साहात स्वागत केले जात आहे. धाराशिव, लातूर यासह मराठवाड्यातील अनेक गावांतून येणाऱ्या शंभू महादेवाच्या कावड काठी माढा तालुक्यातून शिखर शिंगणापूरकडे मार्गस्थ होत आहेत. दारफळ गावात आजी काठी’ व ‘नात काठी’ यांच्या भेटीचा सोहळा अनेक भाविकांनी पाहिला.