माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

तब्बल दीडशे वर्षांनंतर लुप्तप्राय प्रजातीचे माढ्यात अस्तित्व उघड; प्रा. मयूर चव्हाण यांचे संशोधन.
Global Recording of 'Chrysilla Volup' in Madha College Campus; Major Milestone in Biological Research

Global Recording of 'Chrysilla Volup' in Madha College Campus; Major Milestone in Biological Research

Sakal

Updated on: 

माढा : माढा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय व परिसरात लुप्तप्राय म्हणून गणल्या गेलेल्या अनोख्या प्रजातीचा रहिवास आढळून आला असून त्यास जीवशास्त्रीय संशोधनामध्ये जागतिक महत्त्व आहे.या प्रजातीला जगातील शास्त्रज्ञांनी सुमारे दीडशे वर्षांपासून लुप्त झालेल्या प्रजातींमध्ये गणले होते त्यामुळे या प्रजातीचे अस्तित्वच काळाच्या पडद्याआड गेलेले. हा सजीव आकाराने ४ ते ५ मिलीमीटर इतका सूक्ष्म असलेला ‘क्रिसिला व्होल्युप’ ज्यास मराठीत 'इंद्रधनुष्य कोळी' म्हणता येईल. हा अनोखा बहुरंगी 'कोळी' आहे. जो माढा महाविद्यालयाच्या परिसरात दृष्टीस आला आहे. प्रा.मयूर दत्तात्रय चव्हाण यांनी या अत्यंत दुर्मीळ प्रजातीची नोंद केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com