Vijaysinh Mohite Patil
Vijaysinh Mohite Patilsakal

Vijaysinh Mohite Patil : माढ्याच्या लढाई बरोबर विजयदादा सोलापूरच्या लढाईसाठी मंगळवेढ्यात

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विजयसिंह मोहिते-पाटील व सुशीलकुमार शिंदे यांचा राजकीय दबदबा 2009 पर्यंत कायम होता.

मंगळवेढा - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात, घरवापशी केलेल्या माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांन माढ्याबरोबर सोलापूरची लढाई सर करण्यासाठी मंगळवेढा दौऱ्यात जुन्या सहकार्याला एकत्र घेत प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी कानमंत्र दिला.

जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विजयसिंह मोहिते-पाटील व सुशीलकुमार शिंदे यांचा राजकीय दबदबा 2009 पर्यंत कायम होता. त्यातून त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावत जिल्ह्याची राजकीय घडी बसवली. परंतु 2009 नंतर त्यामध्ये अनियमितता आली.

मोहिते पाटलांनी कमळ जवळ करत भाजपाची सलगी केली तर सुशीलकुमार शिंदे यांना लोकसभेच्या सलग दोन पराभवाला सामोरे जावे लागले त्याचे परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर झाले. जिल्हा भाजपमध्ये झाला असला तरी दुसऱ्यांदा सत्तेच्या कार्यकाळात मंत्रिपद मिळवण्यात जिल्हा अपयशी ठरला.

शिवाय जिल्ह्यातील अनेक प्रश्न रखडत राहिल्यामुळे सत्ताधाऱ्याबद्दल नाराजी व्यक्त होत असतानाच माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून अनेक खलबते होऊन अखेर मोहिते- पाटीलानी राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटाला जवळ करत तुतारी फुंकली त्यामुळे माढ्यासह जिल्ह्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली.

अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी हात वर करत पुन्हा जिल्ह्यातील राजकीय गणिते जुळवण्यास सुरुवात केली. माढ्याची लढाई सुरू असतानाच विजयसिंह मोहिते पाटील यांनी नुकताच मोहोळ दौरा करत राजन पाटील यांची भेट घेतली.

त्यानंतर आज मंगळवेढा दौऱ्यात राहूल शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, अमरजित पाटील, चंद्रशेखर कौंडूभैरी, विजय बुरकुल, मारुती वाकडे, राजाराम जगताप, मुजफर काझी, किसन गवळी, यादव आवळेकर, प्रथमेश पाटील, अजिक्य बेदरे, संतोष बुरकूल, नागेश राऊत, बबन ढावरे, जमीर इनामदार, बळवंत पाटील, संतोष रणदिवे, काशीनाथ सावंजी, धनाजी चव्हाण यांच्यासह अनेक सहकार्यांना काँग्रेस उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना राहुल शहा म्हणाले की, वाढलेली महागाई व बेरोजगारी महिला संरक्षणाचा विचार करता सत्ता बदल गरजेचा आहे. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत. अमरजीत पाटील म्हणाले की, दहा वर्षात जिल्ह्यातील विकासाला अपेक्षित गती मिळाली नाही. शेतकरी महिला मजूर यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

त्यामुळे योग्य माणसाच्या हाती जिल्ह्याची सूत्रे देण्याची गरज निर्माण झाली सोमनाथ माळी म्हणाले की, शिक्षित तरुणांना सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीये त गॅस दरवाढीने महिला त्रस्त आहेत. शेतीमालाला दर नसल्यामुळे शेतकरी देखील त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा विचार करणारे सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे.

चंद्रशेखर कोंडूभैरी म्हणाले की, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोहिते पाटील आणि शिंदे नसल्यामुळे जिल्हा विकासापासून दूर गेला.शहा कुटुंबाच्या तीन पिढ्याशी संबंध राहिले. आता पुन्हा एकत्र आल्यामुळे जिल्ह्याला विकासाची संधी प्राप्त झाली. त्यामुळे सर्वांनी आपण मोहिते पाटील व शिंदे यांच्या मागे उभा राहण्याची गरज आहे. यावेळी राजाराम जगताप, अजिंक्य बेदरे, जमीर इनामदार भीमराव मोरे यांची भाषणे झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com