

Grape and Mango Crops Suffer Major Damage
Sakal
माढा, ता. : माढा तालुक्यात गुरुवारी (ता . १९) सायंकाळी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विठ्ठलवाडी, उपळाई खुर्द, मोडनिंब यासह अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात गारपिट झाली. या गारपिटीमुळे द्राक्षे, आंबा यांसारख्या बागवर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.