Madha: माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे निलंबित; राज्य शासनाची कारवाई;आमदार पाटलांच्या आमसभेचा पहिला झटका..
रणवरे यांनी कामकाजाकडे दुर्लक्ष करून गंभीर अनियमितता केल्याचा ठपका ठेवत शासनाने तहसीलदार विनोद रणवरे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित केले आहे.
Tehsildar Vinod Ranavare suspended after MLA Patil’s public meet sparks administrative scrutiny in Madha.Sakal
माढा/उपळाई बुद्रूक: आमदार अभिजित पाटील यांनी घेतलेल्या आमसभेत नागरिकांच्या तक्रारींमुळे चर्चेत आलेले माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे यांना अखेर निलंबित करण्यात आले. शासकीय कामात गंभीर अनियमितता केल्याचा ठपका ठेवत राज्य शासनाने ही कारवाई केली.