मध्यप्रदेशच्या पोलिसांनी केली 13 ऊसतोड मजुरांची वाफेगावातून सुटका

मध्यप्रदेशच्या पोलिसांनी केली 13 ऊसतोडणी मजुरांची वाफेगावातून सुटका
मध्यप्रदेशच्या पोलिसांनी केली 13 ऊसतोडणी मजुरांची वाफेगावातून सुटका
मध्यप्रदेशच्या पोलिसांनी केली 13 ऊसतोडणी मजुरांची वाफेगावातून सुटकाesakal
Summary

मध्य प्रदेशातील पोलिसांनी येथे येऊन अकलूज पोलिसांच्या मदतीने 13 ऊसतोड मजुरांची सुटका केली.

माळीनगर (सोलापूर) : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ऊसतोडणी मजूर व वाफेगाव (ता. माळशिरस) (Malshiras) येथील शेतकऱ्यात झालेल्या वादामुळे शेतकऱ्याने ऊसतोडणी मजुरांना गावाकडे जाण्यास मज्जाव केला होता. अखेर हे प्रकरण मध्य प्रदेशातील पोलिसात (Madhya Pradesh Police) गेल्याने तेथील पोलिसांनी येथे येऊन अकलूज पोलिसांच्या (Akluj Police) मदतीने 13 ऊसतोड मजुरांची सुटका केली. (Madhya Pradesh police rescue 13 sugarcane workers from Wafegaon)

मध्यप्रदेशच्या पोलिसांनी केली 13 ऊसतोडणी मजुरांची वाफेगावातून सुटका
दूध संघातून मिळणार आगामी निवडणुकांचा राजकीय फॉर्म्यूला!

मध्य प्रदेश येथील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील 13 स्री-पुरुष ऊसतोडणी मजूर ठेकेदारामार्फत ऊसतोडणीची उचल म्हणून काही रक्कम घेऊन काही दिवसांपूर्वी यंदाच्या गळीत हंगामात वाफेगाव येथील शेतकऱ्याकडे आले होते. मात्र, ऊसतोडणीवरून शेतमालक व मजुरांमध्ये काही शाब्दिक वादविवाद झाल्याने मालकाने सर्व मजुरांना मध्य प्रदेशला गावाकडे जाण्यास अडथळा करून मनाई केली होती. त्यानंतर काही मजुरांनी सर्व हकीकत गावाकडे कळवल्याने बुऱ्हाणपूर येथे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेऊन मजुरांना तत्काळ घेऊन येण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार तेथील नायब तहसीलदार राम पगारे हे स्वत: राजस्व निरीक्षक दिवेश डोंगरे, शंकरलाल जोशी, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह 22 डिसेंबर रोजी अकलूज येथे आले होते.

मध्यप्रदेशच्या पोलिसांनी केली 13 ऊसतोडणी मजुरांची वाफेगावातून सुटका
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुशीलकुमार शिंदेंचे दौरे कमी!

त्यांनी अकलूज पोलिसांना ही माहिती दिली. त्यावरून अकलूजचे पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर (Arun Sugavkar) यांनी तत्काळ पोलिस हवालदार अभय कुंभार, विशाल घाडगे, माळीनगर बीट अंमलदार यांना तातडीने जाऊन मदत करण्यास सांगून मजुरांना व मालकांना समक्ष पोलिस स्टेशनला आणून हजर करायला सांगितले. त्यानुसार त्यांनी लगेच ऊसतोड मजूर व मालक यांना हजर केले. मध्य प्रदेशला दाखल झालेल्या प्रकाराबाबतची माहिती मालकाला देऊन मजुरांना गावाकडे जाण्यासाठी तत्काळ सुटका केली व विशेष गाडी करून मध्य प्रदेशला रवानगी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com