येरमाळा - स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंधेला गुरुवारी रात्री धाराशिव जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली. यात जिल्ह्यातील आठही तालुके प्रभावित झाले असुन मांजरा, तेरणा नदीला पुर आल्याने नदीकाटच्या शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे..कळंब तालुक्यातील खोंदला येथील एक शेतकरी मांजरा नदीच्या पुरात वाहून गेल्याने त्याचा अद्याप शोध लागलेला नसताना शनिवारी सकाळी ११ वाजता राज्याचे मा. ना. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याचा दौरा जाहीर झाला.हा दौरा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अतिवृष्टीने संपूर्ण जिल्हा प्रभावित झाला असताना ऐकाच तालुक्याचा दौरा केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या प्रशासनाप्रमाणे इतर नुकसान ग्रस्त शेतकऱ्याशी दुटप्पीपणा असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे..एकीकडे गुरुवारी (ता. १४) रात्री रात्रभर धाराशिव जिल्ह्यात वाशी तालुका वगळता उमरगा, लोहारा, तुळजापूर, धाराशिव, कळंब तालुक्यात अतिवृष्टी झाली. कळंब तालुक्यातील मांजरा, तेरणा नदीला पूर आल्याने अनेक गावांचे चोवीस तास संपर्क तुटले.खोंदला गावात शुक्रवारी (ता. १५) सकाळी वयोवृद्ध ६५ वर्षीय सुबराव लांडगे पुलावरुन जात असताना पाय घसरुन नदीच्या पुरात पडल्याने वाहून गेले, त्यांचा शोध रेस्क्यू टीम घेत असुन अद्याप शोध लागला नाही. मांजरा, तेरणा नदीकाटच्या शेतकऱ्यांचे हजारो एकर सोयाबीन पीक वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे..शनिवारी सकाळी ११ वा. राज्याचे कृषिमंत्री मा. ना. दत्तात्रय भरणे वाशी तालुक्यातील दौऱ्यावर अतिवृष्टी पाहणी दौऱ्यावर येत असल्याच्या दौऱ्याचे कृषी मंत्रालयाचे पत्र व्हायरल झाले. सकाळी आठ वाजता पुणे येथून इंदापूर, एक वाजता येरमाळा मार्गे,अडीच वाजता वाशी शहर, ग्रामीण भागात अतिवृष्टी पाहणी साडेपाच वाजता धाराशिव मार्गे भरणेवाडी आठ वाजता निवासस्थानी जाण्याचा प्रशासकीय दौरा होता..दुसरीकडे अतिवृष्टीने संपूर्ण जिल्हा प्रभावित झाला असताना एकाच वाशी तालुक्याचा दौरा पडल्याने हा इतर अतिवृष्टी पिढीत शेतकऱ्याशी दुटप्पीपणा असल्याच्या चर्चेला नुकसान ग्रस्त शेतकऱ्यातून उधाण आले असुन भूम, परंड्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी नुकताच अजित पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला असुन, हा कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय भरणे यांच्या दौरा म्हणजे केवळ माजी आमदार राहुल मोटे यांच्या जनसंपर्काच्या प्रसिद्धीचा फार्स असल्याचे जानकार राजकीय तज्ञांचे मत व्यक्त केले असले तरी अतिवृष्टीच्या नुकसानीने संपूर्ण जिल्हा प्रभावीत झाला असताना कृषी मंत्र्यांचा वाशी पाहणी दौरा म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या प्रशासना प्रमाणे दुटप्पी पणाचा दौरा असल्याचे अतिवृष्टी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यातून बोलले जात आहे..गुरुवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तेराणानदी काटच्या शेतकऱ्याचे नदीच्या पुराच्या पाण्याने शेकडो ऐकर सोयाबीन वाहून गेले आहे. पूर्ण धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाल्याने राज्याचे कृषी मंत्री राज्याचे कृषी मंत्री असुन त्यानी जिल्ह्याचा पाहणी दौरा करणे गरजेचे असताना ऐकाच वाशी जिल्ह्याचा दौरा केला.- समाधान बाराते, संजितपूर, ता. कळंब नुकसान ग्रस्त शेतकरी..या बाबत कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय भरणे यांना संपर्क साधला असता ते कळंब तालुक्यातील खोंदला येथील पुरात वाहून गेलेल्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी आले आहेत त्यांच्याशी बोलणे दौरा संपेपर्यंत शक्य होणार नाही.- हेमंत पांढरे, स्वीय सहाय्यक.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.