Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

कृष्णा नदीचे पाणी नीरा मार्गे उजनी धरणात वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला २४ कोटींची प्रशासकीय मान्यता; सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यांतील दुष्काळी भागांना कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची आशा
The project is expected to improve irrigation, drinking water supply and water storage in Solapur, Satara and Pune districts.

The project is expected to improve irrigation, drinking water supply and water storage in Solapur, Satara and Pune districts.

Sakal

Updated on

सांगोला : कृष्णा खोरे पाणी तंटा लवाद-१ मधील महाराष्ट्राच्या वाट्याच्या पाण्याचा परिपूर्ण वापर करण्यासाठी कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सर्वेक्षण, अन्वेषण, संकल्पन आराखडा, अंदाजपत्रक व सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास २४ कोटी ५ लाख ६७ हजार १२५ रुपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. दुष्काळी भागाला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने यश आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने २२ जुलै रोजी शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Koyana Dam Water Storage Full
Krishna river water diversion project for Solapur
dead chickens thrown from bypass bridge in Sangli
Maharashtra Karnataka Krishna River water dispute
Marathi News Esakal
www.esakal.com