
सोलापूर : जिल्ह्यात सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या असून सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व पंढरपूर-मंगळवेढ्यात भाजपचा विजय झाला आहे. माळशिरसची जागा भाजपने गमावली खरी, पण येथे राम सातपुते यांनी जोरदार टक्कर दिल्याचे पाहायला मिळाले. २०१९च्या तुलनेत २०२४ च्या निवडणुकीत सातपुते यांनी ५०५९ मते जास्त घेतली आहेत. जिल्ह्यात महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये भाजपच नंबर एक ठरला आहे. ११ पैकी पाच जागा भाजपने जिंकल्या आहेत.