Water conservation measures will be undertaken across 304 drought-affected talukas in Maharashtra.
esakal
सोलापूर : राज्यात सन २०२६ च्या खरीप हंगामात ट्रिगर-१ (प्रथम कळ) आणि ट्रिगर-२ (दुसरी कळ) लागू झालेल्या ३०४ तालुक्यांमध्ये मृद व जलसंधारणाची विविध कामे हाती घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासह अपूर्ण कामे पूर्ण करणे, नादुरुस्त बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे, गावांतील जलसाठ्यांमधील गाळ काढणे आणि नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.