Smart Attendance App
esakal
सोलापूर : शाळांवर शिक्षक येत नाहीत, विद्यार्थी गैरहजर असताना हजेरी लावली जाते अशा तक्रारींवर आता शिक्षण विभागाने उपाय शोधला आहे. इयत्ता अकरावी व बारावीच्या सर्वच शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक (Smart Attendance App) केली आहे. दुसरीकडे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचीही हजेरी आता शालेय शिक्षण विभागाच्या विद्या समिक्षा केंद्राअंतर्गत ‘स्मार्ट उपस्थिती’ या ॲपवर दररोज ऑनलाईन हजेरी नोंदवावी लागणार आहे.