

Maharashtra Agriculture Minister Dattatray Bharane announces ₹5,000 financial assistance for drought-affected farmers.
esakal
सोलापूर : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील सुमारे ९२ लाख शेतकऱ्यांच्या ॲग्रीस्टॅक क्रमांकावरून प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत थेट खात्यात जमा केली जाणार आहे. त्यासाठी वेळखाऊ व किचकट ‘ई-केवायसी’ करावी लागणार नाही. जेणेकरून, मदत मिळण्यासाठी विलंब होणार नाही. पंचनामे करतानाच प्रत्येकाचा ॲग्रीस्टॅक क्रमांक व बॅंक खात्याची माहिती घेतली आहे. त्यामुळे चार नोव्हेंबरपूर्वी मदतीची रक्कम शेतकऱ्यांना मिळेल, असा विश्वास कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.