
सोलापूर : सोशल मीडियावर मत नोंदवताना यापुढे सरकारी अधिकारी - कर्मचाऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. कारण राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयांवर सोशल मीडियावर सरकारी अधिकारी - कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे मत, टीका किंवा आक्षेप नोंदवल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे.