All India Sarpanch Parishad’s Demand to Chief Minister
कुर्डू (सोलापूर) : राज्यात सध्या २ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले असून, येत्या फेब्रुवारी महिन्यात आणखी १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नसल्याने आगामी काळात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती प्रशासकांच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींवर सरपंचांनाच प्रशासक म्हणून नेमण्यात यावे, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याकडे करण्यात आली आहे.