Maharashtra Rain Crisis : राज्यात एल निनोचा विळखा अन् खरीप पिके धोक्यात; कृत्रिम पावसाबाबत कृषीमंत्र्यांची मोठी माहिती

Maharashtra Kharif Crops Face Rainfall Crisis : पावसाअभावी महाराष्ट्रातील खरीप पिकांची वाढ ठप्प झाली असून सोयाबीन, कापूससह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे.
Maharashtra Rain Crisis

Maharashtra Rain Crisis

esakal

Updated on

सोलापूर : राज्यात ‘एल निनो’मुळे समाधानकारक पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभारले असून, खरीप पिकांनी माना टाकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विमा कंपन्यांनी आतापासूनच पीक कापणी प्रयोग सुरू केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनातील सर्वच अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. कृत्रिम पावसाची चर्चा (Maharashtra monsoon) आहे, पण या प्रयोगासाठी अपेक्षित ढग नाहीत. याआधीचे प्रयोग फार यशस्वी झाले नसल्याने याचा विचार नसल्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com