

Teachers Salary Hike
सोलापूर : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील ४८ हजार शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण पार पडले. शिक्षकांना कालबद्ध पदोन्नतीप्रमाणे निवड व वरिष्ठ वेतनश्रेणी दिली जाते. यात पद नाही, पण पगार वाढतो. नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार शासन निर्णयाप्रमाणे शिक्षकांचा तो अधिकार आहे. त्यामुळे वेतनश्रेणी लागू करण्यासाठी ‘टीईटी’ बंधनकारक नसल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयातील विश्वसनिय सूत्रांनी दिली.