

Sudden Drop in Temperature in Solapur
sakal
Solapur: सोलापूर शहर व परिसरात आता थंडीचा जोर वाढला आहे. सायंकाळी ६ पासूनच बोचरी थंडी जाणवत आहे. सकाळी १० पर्यंत थंडीचा हिवाळ्यातील कडाका वातावरणात कायम राहात आहे. यंदाच्या १२.४ अंश सेल्सिअस या नीचांकी तापमानाची नोंद मंगळवारी (ता. ९) झाली होती. त्यानंतर तीनच दिवसांत आज (शुक्रवारी) पुन्हा एकदा यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी १२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.