महास्वामींचा फैसला उद्या?...जंगमचे दोन दाखले रद्द 

mp solapur
mp solapur
Updated on

सोलापूर : अगोदर महादेव कोळी नंतर मराठा कुणबी आणि बेडा जंगम जातीच्या दाखल्यांनी सोलापूरच्या समाजकारणात आणि राजकारणात धुमाकूळ घातला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बेडा जंगम या अनुसूचित जातीचे एक व माला जंगम या जातीचा एक असे जंगम जातीचे दोन दाखले रद्द झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्या दाखल्याकडे. 
हेही वाचा - अण्णासाहेब महामंडळाच्या "या' योजनांकडे शेतकऱ्यांची पाठ! 
खासदारांच्या दाखल्यावर आक्षेप घेत प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंदकुरे यांनी हरकत घेतली आहे. या हरकतींवर सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन सुनावण्या झाल्या आहेत. उद्या (शनिवार, ता. 1) या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूप येथील तत्कालीन सरपंच विश्‍वनाथ हिरेमठ यांच्याकडे असलेले बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र या पूर्वी रद्द करण्यात आले आहे. त्यानंतर आज जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने महापालिकेच्या परिवहन खात्यातील निवृत्त समयलेखक विश्‍वनाथ स्वामी यांचा माला जंगम जातीचा (अनुसूचित जाती) दावा अमान्य केला आहे. 
हेही वाचा - सत्ताधाऱ्यांची उदासीनता; "या' शहराचे होणार तीन-तेरा 
जंगम समाज इतर मागास प्रवर्गात मोडत असल्याचा निष्कर्ष जात प्रमाणपत्र पडताळणीच्या दक्षता पथकाने काढला आहे. विश्‍वनाथ स्वामी यांच्या विरोधात परिवहन मधील निवृत्त मुख्य वाहतूक निरीक्षक भारत कंदकुरे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे डिसेंबर 2014 मध्ये तक्रार केली होती. उद्या (शनिवारी) खासदार महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रावर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर सूळ, सचिव संतोष जाधव व सदस्या छाया गाडेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The mortal remains of Indian Army soldier Vaibhav Avtade were accorded a state funeral at his native village Ganeshwadi in Mangalwedha, Solapur district.
solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
Marathi News Esakal
www.esakal.com