भाजप सरकारने काढून घेतलेले नगराध्यक्षांचे अधिकार महाविकास आघाडी सरकारकडून पुन्हा बहाल

Nagaradhyaksha
Nagaradhyaksha
Updated on

मंगळवेढा (सोलापूर) : तत्कालीन भाजप सरकारने थेट जनतेने निवडलेल्या नगराध्यक्षांकडून काढून घेतलेले अधिकार पुन्हा महाविकास आघाडी सरकारने पूर्ववत अधिकार बहाल केल्याने त्याचा फायदा राज्यातील 371 नगराध्यक्षांना मिळणार आहे. यामुळे शहराच्या विकासाला गती येणे शक्‍य होणार आहे. 

2018 मध्ये भाजप सरकारने नगर परिषद व नगरपंचायती अधिनियमाच्या कलम 58 नुसार नगराध्यक्षांना प्राप्त प्रशासकीय अधिकार काढून टाकले होते. मुख्याधिकारी यांना सर्व प्रशासकीय अधिकार प्रदान केले होते. त्यामुळे नगरपरिषदेत लाल फितीशाही अस्तित्वात येऊन जनतेची कामे करणे नगराध्यक्षांना कठीण होऊन बसले होते. घटनेच्या 73 व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज असलेल्या संस्था बळकट करण्यात आल्या होत्या आणि या स्वायत्त संस्थांवर प्रशासनाचे निर्बंध कमी करण्यात आले. परंतु, मागील सरकारने नगरपरिषद कायद्यात दुरुस्ती करून लोकनियुक्त नगराध्यक्ष व सदस्यांचे अधिकार कमी करून ते मुख्याधिकारी यांना प्रदान केले होते. त्यामुळे लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांना जनतेची कामे करणे अशक्‍य झाले होते. 

महाविकास आघाडी सरकारने यामध्ये बदल करत लोकप्रतिनिधी हे जनतेमधून निवडून आलेले असतात, त्यांच्यामधून नगराध्यक्ष निवडलेला असतो, नगराध्यक्षाला जनतेप्रती उत्तरदायित्व असते. मुख्याधिकारी पदावरील अधिकारी हा प्रशासनाकडून आलेला असल्याने तो मनमानी पद्धतीने काम करीत असतो आणि निर्णय घेत असतो. त्याचा परिणाम नागरिकांवर व विकासावर होत असतो. परिणामी हवा तसा न्याय देता येत नाही. अशा परिस्थितीत नगरपालिकेच्या वित्तीय व कार्यकारी प्रशासनावर नगराध्यक्ष पदावरील अधिकाऱ्यांचे लक्ष व नियंत्रित असणे आवश्‍यक वाटल्याने त्यांना पूर्वीप्रमाणे अधिकार महाविकास आघाडी सरकारने दिल्याने नगराध्यक्षांमधून सरकारच्या निर्णयाचे अभिनंदन होत आहे. 

शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष जनतेमधून निवडला गेला; परंतु विकासाच्या कामावर तत्कालीन सरकारच्या आदेशामुळे मर्यादा आल्याने नागरिकांकडून विकास कामांच्या मागणीची पूर्तता करू शकत नव्हती. यात मुख्याधिकारीच वरचढ होऊ लागल्याने विकासाची गती मंदावून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात वाद वाढल्याची ही बाब महाविकास आघाडी सरकारच्या लक्षात आल्यामुळे पूर्वीप्रमाणे नगराध्यक्षांना अधिकार देण्यात आले. यामुळे उर्वरित काळात शहराच्या विकासाला गती देणे शक्‍य होणार आहे. 
- अरुणा माळी, 
नगराध्यक्षा, मंगळवेढा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

महाराष्ट्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com