Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawaresakal
सोलापूर
Cabinet expansion: सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद नाहीच! पालकमंत्री उपराच मिळणार
Solapur Politics: सोलापूर शहर व जिल्ह्यात भाजपचे विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे व अक्कलकोटचे सचिन कल्याणशेट्टी व पंढरपूरचे समाधान आवताडे अशा एकूण पाच आमदारांना दणदणीत मताधिक्यांनी विजयी केले आहे. यातील विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख यांना मंत्री पदाच्या कामाचा चांगला अनुभव आहे.
मोहोळः महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथवीधी थाटामाटात नागपूर येथे पार पडला. यामध्ये सोलापूर जिल्ह्याला आकस बुध्दीने पुन्हा डावलण्यात आल्याचं बोललं जातंय. सोलापूरच्या आमदारांमधे कर्तृत्व नाही का? हे पुन्हा-पुन्हा सिध्द करण्याचा केविलवाना प्रयत्न केला जातोय. सोलापूरला कोणतेही मंत्रीपद नाही. या उलट जिल्ह्याचा पालकमंत्री सुध्दा स्थानिक नाही. परिणामी आगामी पाच वर्षांत जिल्ह्याचा विकासावर प्रश्न चिन्ह कायम दत्त म्हणू उभं राहिलं आहे.

