esakal | अक्कलकोटमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई! 20 लाखांचा; दहा वाहने जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Sand Transport

अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या वतीने अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी विविध मार्गांवर अचानक धाडी टाकण्यात आल्या.

अक्कलकोटमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई! 20 लाखांचा; दहा वाहने जप्त

sakal_logo
By
चेतन जाधव

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट (Akkalkot) तहसील कार्यालयाच्या वतीने अवैध वाळू उत्खनन व वाहतूक (Illegal sand transportation) रोखण्यासाठी विविध मार्गांवर अचानक धाडी टाकण्यात आल्या. या टाकण्यात आलेल्या धाडीत सुमारे दहा वाहने जप्त करण्यात आली असून, संबंधितांना वीस लाख रुपयांचा महसूल (Revenue) दंड होणार असल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. कारवाईत जप्त करण्यात आलेली अंदाजे 100 ब्रास वाळू असून, तडवळ येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात जमा करून ठेवली आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे (Crime) दाखल करण्याचे आदेश अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यास (Akkalkot South Police Station) देण्यात आले आहे.

हेही वाचा: ओबीसी आरक्षणावरून प्रणिती शिंदे म्हणाल्या, 'या' समाजानेच टिकवली लोकशाही

उपविभागीय अधिकारी (क्रमांक दोन) मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी ही मोठी कारवाई केली. तालुक्‍यात अवैध वाळू वाहतूक होत असलेल्या मार्गांवर वेळोवेळी अचानक धाड टाकून वाळू वाहतूक करणारे चार टेम्पो, चार हायवा, एक ट्रक, एक ट्रॅक्‍टर जप्त करण्यात आला आहे. या वाहनांवर महसूल विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्याचे काम चालू असून, संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. सुमारे वीस लाख रुपयांचा महसूल दंड म्हणून वसूल होणार आहे.

हेही वाचा: दुर्दैवी! माजी सैनिकाच्या मृत्यूनंतर पोस्टमॉर्टेमसाठी पैशाची मागणी

याकामी तहसील कार्यालयाकडून फिरते पथक, स्थिर पथक नेमण्यात आले असून, या पथकांमार्फत अचानक धाड घालण्याचे काम सुरू आहे. तसेच गुड्डेवाडी, खानापूर, तडवळ या भागात ठिकठिकाणी वाळूचे अवैधरीत्या साठे करण्यात आल्याचेही दिसून आले आहे. ही सर्व वाळू अंदाजे 100 ब्रास असून तडवळ येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात जमा करून ठेवली आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यास देण्यात आले आहे.

loading image
go to top