
मोडनिंब : महामार्ग प्रशासनाच्या अक्षम्य चुकीमुळे होणारा एक मोठा अपघात आज (शनिवारी) केवळ प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्यामुळे टळला; अन्यथा मोठी जीवित हानी झाली असती. रस्त्यावरील कामांसाठी कुशल कामगार असणे आणि या कामगारांमध्ये सजगता निर्माण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे या घटनेवरून दिसून आले.