Malshiras Bypass Road Car Accident
esakal
माळशिरस (सोलापूर) : दोन तरुणांच्या प्रसंगावधानामुळे उलटून पेटलेल्या कारमधील दोन महसूल अधिकाऱ्यांचा जीव वाचल्याची घटना काल (गुरुवारी) संध्याकाळी ७.३० च्या सुमारास माळशिरस बायपास महामार्गावर (Malshiras Car Accident) घडली. समाधान शिंदे व नीलेश कुंभार असे महसूल अधिकाऱ्यांची नावे आहेत. तर शिवाजी वाघमोडे व सिद्धेश्वर जाधव असे दोघांना वाचवणाऱ्या तरुणांची नावे आहेत.