
माळशिरस : तालुक्यात २०२४-२०२५ या आर्थिक वर्षासाठी सहा हजार ३६ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. कागदपत्रांची पूर्तता केलेल्या चार हजार १५६ लाभार्थ्यांच्या नावावर दोन दिवसांत प्रत्येकी १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात येणार असल्याची माहिती माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी दिली.