Solapur Crime : वाघाची कातडी बाळगणाऱ्यास शनिवारपर्यंत कोठडी

छाप्यात एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये वाघसदृश वन्यजीव प्राण्याची सोलून काढलेली, सुकलेली अंदाजे अडीच लाख किमतीची कातडी व अंदाजे एक लाख रुपये किमतीचा एक हस्तिदंत असा एकूण सुमारे साडेतीन लाख किमतीचा मुद्देमाल मिळून आला. तो पोलिसांनी जप्त केला.
Tiger skin recovered during the raid; accused sent to police custody till Saturday under Wildlife Protection Act.
Tiger skin recovered during the raid; accused sent to police custody till Saturday under Wildlife Protection Act.Sakal
Updated on

टेंभुर्णी : वाघाची कातडी व हस्तिदंत तस्करी करण्यासाठी जवळ बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या टेंभुर्णीतील संशयित आरोपी अमोल विजयकुमार शहा याला माढा येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता, शनिवारपर्यंत (ता. २८) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनय कुलकर्णी यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com