
सोलापूर : मंगळवार बाजारातील गणेश शॉपिंग सेंटरजवळील सेंट्रल हॉस्पिटलसमोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाने (एमएच ०२, ईआर ५०२६) सोहेल पीरसाब पटेल (वय ४८, रा. शनिवार पेठ) यांना जोरात धडक दिली. त्यात त्यांच्या पायांना दुखापत झाली. त्यानंतर वाहनचालकासह अन्य चौघांनी सोहेल पटेल यांनाच बेदम मारहाण केली. पटेल यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.