शंकरराव मोहिते बॅंकेच्या व्यवस्थापकांनी केली फेरलेखापरीक्षणाची मागणी | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शंकरराव मोहिते बॅंकेच्या व्यवस्थापकांनी केली फेरलेखापरीक्षणाची मागणी!
शंकरराव मोहिते बॅंकेच्या व्यवस्थापकांनी केली फेरलेखापरीक्षणाची मागणी!

शंकरराव मोहिते बॅंकेच्या व्यवस्थापकांनी केली फेरलेखापरीक्षणाची मागणी

नातेपुते (सोलापूर) : अकलूजच्या (Akluj) शंकरराव मोहिते-पाटील सहकारी बॅंकेत (Shankarrao Mohite-Patil Bank) कोणत्याही प्रकारचा घोटाळा (Fraud) झाला नाही. ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत. ऑडिटरने संचालक मंडळाला अंधारात ठेवून खोटा गुन्हा दाखल केला. त्यांच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद देऊन फेर लेखापरीक्षणाची मागणी करणार असल्याची माहिती बॅंकेचे व्यवस्थापक नितीन उघडे (Nitin Ughade) यांनी दिली.

हेही वाचा: सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील बॅंकेत 27 कोटींचा अपहार!

अकलूज येथील शंकरराव मोहिते-पाटील बॅंकेत 27 कोटी रुपयांची अफरातफर झाल्याची तक्रार लेखापरीक्षक बी. जी. राठी (पुणे) यांनी दिली आहे. याबाबत बॅंकेचे व्यवस्थापक नितीन उघडे म्हणाले, राठी हे आमच्या बॅंकेचे लेखापरीक्षणाचे काम करतात. ते आमच्याकडून ई-मेलवर कागदपत्रे मागवून घेत होते. त्यानुसार आम्ही कागदपत्रे पुरवित होतो. ते ऑडिटसाठी बॅंकेत आलेले नाहीत. याउलट त्यांनी थेट पोलिसांकडे दिलेल्या अहवालाचा कागदही मला किंवा संचालक मंडळाला दिलेला नाही. त्यामध्ये काही पूर्तता करावी लागत असल्याचे कळविले नाही. कसलाही खुलासा न घेता आम्हाला अंधारात ठेवून थेट गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे बॅंकेच्या खातेदार, ठेवीदारांमध्ये संभ्रम आहे. त्याबद्दल आम्ही त्यांच्यावर पोलिसात फिर्याद देणार आहोत.

1975 साली सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी या बॅंकेची स्थापना केली. बॅंकेचे सात हजार सभासद आहेत. ठेवीदार आणि कर्जदार मिळून जवळपास चाळीस हजार लोकांशी या बॅंकेचे नाते आहे. बॅंकेचे अकलूज येथे मुख्य कार्यालयासह दहा शाखा कार्यरत आहेत. बॅंकेकडे 103 कोटींच्या ठेवी असून 65 कोटीचे कर्ज वाटप आहे. असे असताना संस्थेला बदनाम करण्यासाठी हा खोटा गुन्हा दाखल केला आहे. फेर लेखापरीक्षणाची मागणी केलेली आहे. सत्य बाहेर येईल. ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असून कोणताही धोका नसल्याचे आणि ठेवीदारांनी काळजी न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

loading image
go to top