

Rural Education Achievement
esakal
बिसलसिद्ध काळे
दक्षिण सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून एमएस-सीआयटी व टॅली या संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी ३५० हून अधिक विद्यार्थ्यांची प्रवेश नोंदणी करून मंद्रूप येथील डी. एस. कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूटने ग्रामीण भागातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेला ‘सर्वोत्कृष्ट संगणक संस्था २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकतेच सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित एमकेसीएलच्या वार्षिक सभेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.