मंद्रूप, नवीन विडी घरकुल, कवठा तांडा येथे आढळले आज नवीन कोरोना बाधित

corona
corona
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिका क्षेत्र वगळून) आज नवीन तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.नवीन तिन्ही रुग्ण पुरुष आहेत. कोरोनाचा चाचण्याचे 28 अहवाल आज सायंकाळी 5 पर्यंत प्राप्त झाले असून त्यापैकी 25 निगेटिव्ह तर तीन पॉझिटिव्ह आहेत. 

कोरोना मुक्त झालेल्या एका पुरुषाला आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आज नव्याने आढळलेल्या तीन कोरोना बाधित व्यक्तींमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील पोलीस लाईनमधील एक पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्यातील नवीन विडी घरकुल येथील एक पुरुष आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठा तांडा येथील एक पुरुष यांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता 73 झाली आहे. 6 व्यक्तींचा आतापर्यंत मृत्यू झाला असून सहा व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या आहेत. उर्वरित 61 व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातील  32 कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Success Through Dedication: 16 Solapur Students Earn Prestigious CA Qualification
MLA Uttamrao Jankar :
पीककर्जासाठी बॅंकांची अट
anti corruption buro, solapur
Marathi News Esakal
www.esakal.com