Solapur : ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून मंगळवेढा विकासकामांसाठी 5 कोटी

मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील खडीकरण,मुरमीकरणाची रस्ते,क्रॉकीटीकरण
MLA Samadhan avtade
MLA Samadhan avtade sakal

मंगळवेढा : ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते मुरमीकरण व खडीकरणासह,पिण्याच्या पाण्याची सुविधा, विकासकामांसाठी 5 कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आ समाधान आवताडे यांनी दिली.

राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर शिंदे फडणवीस सरकार आल्यामुळे आ समाधान आवताडे यांनी निधी मिळविण्याचा सपाटा लावला असून या निधीमधून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील खडीकरण,मुरमीकरणाची रस्ते,क्रॉकीटीकरण, सरंक्षित भिंत व पाण्याची सुविधा करणे आदी कामे होणार असल्याचे आ समाधान आवताडे यांनी सांगीतले.पंढरपूर तालुक्यात त.शेटफळ (बाबर ते साबळे वस्ती रस्ता), शिरगाव(शिरगाव ते अनवली रस्ता), कासेगाव (कुरे ते दासाब मळा रस्ता तसेच मायनर वस्ती ते भुसे नगर शाळा), कोर्टी (ज्ञानू ढोपे ते अर्जुन ढोपे वस्ती रस्ता),

गादेगाव (सिद्धनाथ भिमराव बागल नाला डीवाय 25 ते विक्रम छगन बागल वस्ती) कासेगाव (समाधान बिरा मासाळ ते 32 डीवाय कॅनॉल), गादेगाव (हुडेकरी वस्ती ते स्मशानभूमी रस्ता), कोर्टी (बुर्‍हाण शेख, माळी वस्ती ते गादेगाव रस्ता, बोहाळी (बोहाळी ते जुना गादेगाव रस्ता), उंबरगाव (खंडोबा मंदिर ते बाळू चव्हाण वस्ती रस्ता), तनाळी (कॅनॉल रस्ता ते विठ्ठल लवटे महाराज रस्ता), कासेगाव (चव्हाण पूल ते मुजावर वस्ती रस्ता),कासेगाव (गंगथडे वस्ती ते जाधव वस्ती रस्ता), अनवली (ज्योतिबा मंदिर ते गांजाळे आणि घोडके वस्ती रस्ता), गोपाळपुर (मंगळवेढा पंढरपूर रोडला जोडणारा गोंदवलेकर महाराज रस्ता),मुंढेवाडी (दत्ता मोरे वस्ती ते पांडुरंग राऊत वस्ती), कौठाळी (माणिक आप्पानाला ते हुलगे वस्ती रस्ता), शिरढोण( विठ्ठल बंडगर घर ते रामचंद्र लवटे / जगन्नाथ गाडवे घरापर्यंत रस्ता),गादेगाव (नारायण आवताडे वस्ती संभाजी शिवाजी बागल वस्ती),तनाळी (काशिलिंग नगर ते कॅनल रस्ता),तावशी (सरदार ओढा ते वराडदेवी रस्ता),या रस्त्याच्या खडीकरण व मुरमीकरणासाठी प्रत्येकी 10 लाख रु तर वाखरी (वडाची वस्ती अंतर्गत रस्ते) तावशी (अभिजीत शिंदे घर ते कुमार शिंदे घर रस्त्याच्या क्रॉक्रीटीकरणासाठी प्रत्येकी 10 लाख ,एकलासपुर (एकलासपुर ते गुळ कारखाना),

सिद्धेवाडी व कासेगाव रस्ता, एकलासपुर( शिरगाव रोड ते लाड वस्ती शाळा ), लक्ष्मी टाकळी (गणपती चौक ते मोरे घर रस्ता), लक्ष्मी टाकळी (समता नगर अण्णाभाऊ साठे शाळेपाठीमागील रस्ता) मुरमीकरण व खडीकरणासाठी प्रत्येकी 5 लाख तर मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी (शिंदे - गडदे वस्ती ते डोंगरगाव रस्ता), मरवडे ते मुढेवाडी, अकोला ते शेजाळ वस्ती ते शिवार (सातकी) रस्ता,सोड्डी ते कोकणगाव रस्ता,देगांव हद्दीतील दादा पाटील सर ते जिजाबा माळी वस्ती पर्यंत जाणारा कॅनॉल पट्टी रस्ता, हिवरगांव ते कोळेकर, शिवाजी फटे वस्ती रस्ता मुरमीकरणासाठी प्रत्येकी 5 लाख, उचेठाण ते स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता,कचरेवाडी ते पाटखळ ते सरवळे वस्ती मुरमीकरण व खडीकरण प्रत्येकी 7 लाख, लोणार (वाघमोडे वस्ती ते हुन्नुर लगत रस्ता), शेलेवाडी( शेलेवाडी ते जुना आंधळगाव रस्ता) कचरेवाडी (स्मशानभूमी ते कोळेकर वस्ती रस्ता काँक्रिटीकरण ),

घरनिकी ते मोरे मळा बंधारा रस्ता,बोराळे एम. एस. ई. बी. ते अरळी हद्दीपर्यंतचा रस्ता,पाटकळ रोड ते जाधव वस्ती रस्ता, उचेठाण ते मुढवी शिवपर्यंत जाणारा रस्ता, ब्रह्मपुरी ते बठाण शिवपर्यंत जाणारा रस्ता, माचणूर( सुखदेव सरवदे वस्ती ते बाळासाहेब बेदरे वस्तीपर्यंत रस्ता), तांडोर (बाबूसिंग रजपूत वस्ती ते बाळासाहेब मळगे वस्ती),आंधळगाव ते शेलेवाडी शिवरस्ता, शिरसी (दत्ता गायकवाड ते कुलाळ वस्ती), डोंगरगाव (जि. प.शाळा उन्हाळे वस्ती ते नानासाहेब उन्हाळे वस्ती),येळगी रस्ता, भोसे (रामचंद्र कोपे वस्ती ते बंडू खडतरे वस्ती,संत चोखामेळा नगर (मैंदर्गिकर घर रस्ता ते श्रीरंग काटे रस्ता), रहाटेवाडी (मारुती दत्तू पवार घर ते विकास पवार घर रस्ता),रहाटेवाडी (सतीश पाटील ते अनिल पितांबर पवार घर रस्ता),दामाजी नगर (डोके हॉस्पिटल ते महादेव आवताडे घर रस्ता), तामदर्डी ते अरबळी रस्ता ,तळसंगी (रोड ते दुधाळ वस्ती रस्ता),खवे ते मेटकरी वस्ती रस्त्याचे खडीकरण व मुरमीकरणासाठी प्रत्येकी 10 लाख,

जित्ती येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक 5 लाख, नंदुर येथील मलिकशहा दर्गा कट्टा सुशोभिकरण 5 लाख, फटेवाडी येथील महिला बालकल्याण अंगणवाडी वॉल कंपाउंड 3 लाख, ढवळस येथे पाईपलाईन व पाण्याची टाकी 5 लाख, माळेवाडी जि. प. शाळेस वॉल कंपाउंड 5 लाख, कागष्ट येथील गाव अंतर्गत रस्ता व मल्लेवाडी (शरदनगर) जि. प. शाळा रस्ता काँक्रिटीकरण 5 लाख, मारोळी (पुकळे वस्ती ते करेवस्ती रस्ता) खडीकरण 3 लाख, बालाजी नगर येथील दुर्गादेवी मंदिर येथे सामाजिक सभागृह 8 लाख, दामाजी नगर (लक्ष्मण जगताप प्लॉट अंतर्गत 200 मीटर रस्ता 10 लाख, हिवरगाव अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण 10 लाख,असा निधी मंजूर करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com