मंगळवेढा : वीज थकबाकी शेतकऱ्यावर राग घरगुती कनेक्शन धारकांवर

शेतीपंपाचे मीटर असलेल्या शेतकऱ्यांच्या मीटरचे रीडिंग न घेता मोघम बिले
maharashtra
maharashtraSakal
Updated on

बातमीदार हुकूम मुलाणी

मंगळवेढा: सकाळ वृत्तसेवा शेती पंपाच्या थकबाकीवरून वीज पुरवठा खंडित करून महावितरणने दुष्काळी तालुक्यातील शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे धोरण स्वीकारले असतानाच शेतकऱ्यावरील राग सध्या घरगुती वीज ग्राहकांवर काढण्याचा सपाटा देखील महावितरण लावला.त्यामुळे महावितरणच्या मनमानी कारभाराला चाप कोण लावणार असा सवाल तालुक्यातून विचारला जात आहे.

शेतीपंपाचे मीटर असलेल्या शेतकऱ्यांच्या मीटरचे रीडिंग न घेता मोघम बिले देणाऱ्या महावितरणने डिसेंबर महिन्यात वीज पुरवठा खंडित करून हातातोंडाशी आलेली पिके वाया घालवली असतानाच आता पुन्हा मार्चअखेर बहुतांश शेतकरी संभाव्य उन्हाच्या तीव्रतेमुळे ऊस कारखान्याला लवकर गाळप करण्यासाठी टोळ्यांची मनधरणी करत आटापीटा करत असतानाच पुन्हा वीज पुरवठा खंडित करून ऊस तोडणी अभावी वाळवत ठेवण्याची वेळ आली तर ज्या शेतकऱ्यांच्या दारात पशुधन आहे त्या शेतकऱ्यांना देखील पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याचा फटका दक्षिण भागातील निंबोणी सबटेशन अंतर्गत असलेल्या गावांना अधिक प्रमाणात दिसून येत आहे दिवसातून पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली फक्त तासभर वीजपुरवठा सुरळीत केला जातो. त्याची कल्पना निवडक लोकांना माहीत असतो त्यामुळे सरसकट पिण्याचे पाणी भरणे काही शेतकऱ्यांना होत नाहीत तर काही वेळा त्याच कालावधीत देखील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे.

शेतातील उभी पिके आणि दारातील जनावरे कासावीस होताना पाहणे शेतकऱ्यांना मरण दिसत आहे सध्या सबटेशन मधून वीज पुरवठा सरसकट खंडित केला. याचा त्रास बिल भरलेल्या शेतकऱ्यांना तर बसला.वास्तविक पाहता ज्या शेतकऱ्याचे बिल थकले आहे त्याचा विद्युत पुरवठा खंडित करणे अपेक्षित असताना सरसकट डिसेंबर महिन्यात वीज बिल भरलेल्या शेतकऱ्यांचा देखील वीजपुरवठा सध्या खंडित केला आहे शेती पंपाच्या फिडर वरून घरगुती कनेक्शन घेतलेल्या वीज ग्राहकांचा देखील वीजपुरवठा दिवसा बंद ठेवण्याचा प्रताप महावितरणने सुरू केला याबाबत विचारले असता महावितरणचे अधिकारी देखील सिंगल फेज सप्लाय वरुन मोटर चालू करत असल्याचे सांगण्यात आले. कनिष्ठ अधिकाऱ्याच्या कृत्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समर्थन केल्यामुळे शेतकऱ्यावरील तीव्रता लक्षात येते शेतकऱ्यावरील राग नियमित वीज बिले भरणाऱ्या घरगुती वीज कनेक्शन धारकावर काढला जात आहे त्यामुळे सध्या महावितरणच्या या मनमानी कारभाराला विचारणार कोण असा सवाल शेतकऱ्याकडून विचारला जात आहे.

घरगुती कनेक्शन धारकाची वीज बिले नियमित भरून देखील उन्हाळ्याच्या दिवसात खंडित करण्यामागचे कारण काय यावरील शेतकऱ्यावरील राग दिसून येतो.

नामदेव चौगुले भाळवणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com