Solapur National Highway | मंगळवेढा - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग झाला सुसाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mangalvedha Solapur National Highway

मंगळवेढा - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग झाला सुसाट

ब्रह्मपुरी : सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील भीमा नदी तीरावर जोडणाऱ्या बेगमपुर- माचनुर नूतन पुलाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपविभागीय आप्पासाहेब समिंदर, तहसीलदार स्वप्निल रावडे, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग अधिकारी संजय कदम, ठेकेदार व्यवस्थापक सुशील सिंग,अनिल दुबे , असलम चौधरी , अर्जुन पाटील ,राजेंद्र पाटील, इलियास चौधरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या बेगमपूर पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून एकेरी बाजूने वाहतुकीस हा पूल चालू करून प्रवाशी वर्गाने दिलासा दिला आहे .गेली तीन वर्ष झाले राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे अनेक प्रवासी वर्गांना येण्या-जाण्यासाठी या महामार्गावर जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यासाठी कसरत करावी लागत होती. सदर बेगमपूर पुलावरील एकेरी वाहतूक चालू झाल्यामुळे प्रवाशी वर्गातून वाहतूक करणे सोफे झाले आहे.

तसेच या महामार्गावर होणारे अपघात यामुळे कित्येक जणांना प्राणास मुकावे लागले राष्ट्रीय महामार्गाचे काम रेंगाळले मुळे प्रवासी वर्गांना वाहतूक करणे जिकरीचे होते. सध्या सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावर बेगमपूर येथील नवीन फोन वाहतुकीस खुला केल्यामुळे अनेक अत्यवस्थ रुग्णांना सोलापूरला सुसाट जाणे सोपे झाले असून रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. तसेच हा महामार्गावर कमी वेळेत अंतर पार करून वेळेचेही बचत होऊन इतर कामे होण्यास मदत झाली आहे.

महामार्गावरील इंचगाव ते मंगळवेढा दरम्यान सतत चे अपघात , भीमा नदीवर असलेल्या बेगमपूर येथील नवीन पुलाच्या कामामुळे जुन्या पुलावरती सततची वाहनाची रेलचेल, ऊस वाहतूक वाहने,चढ उतार रस्ते, अरुंद पूल ,सुरक्षारक्षक कठडे नसने आदी धोका पत्करून प्रवासी वर्गांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत होता तसेच बेगमपूर येथील बाजारपेठ मोठी असल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक भागातील खेड्यांची आवक-जावक होत होती परंतु जुन्या पुलावर होणारी सततची अडचण, ट्राफिक जाम ,अपघात याचा त्रास या भागातील प्रवासी वर्गांना सोसावा लागत होता. नवीन पूलाचे वाहतुकीस लवकरात लवकर खुला करावा अशी मागणी प्रवासी वर्गातून व ग्रामस्थांतून होत होती.

सदर अडचणी प्रशासनाने दूर करून नवीन पुलाची एकेरी मार्ग वाहतुकीस सुरू केल्यामुळे प्रवास करणे सोपे झाले असून ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे .तसेच पुलाची दुसरी बाजू लवकर पूर्ण करून राष्ट्रीय महामार्गाचे अंतिम कामे पूर्ण करावीत असे जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व कंपनी ठेकेदारास सांगितले.

तसेच यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मौजे

ब्रह्मपुरी , माचनूर येथे तलाठी कार्यालयास भेट देऊन सुंदर माझे कार्यालय या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यालयीन कामकाज तसेच सदर गावातील सजेची पाहणी करुन नवीन जागेची माहिती घेऊन उपलब्ध करून दिली जाईल असे सांगितले. माचणूर येथील असणाऱ्या मुघलकालीन किल्ल्याची पाहणी करत असणाऱ्या अडचणी सोडवून उपलब्ध सुविधा करून देण्यात येईल असे ग्रामस्थाना सांगण्यात आले .यावेळी उपसरपंच उमेश डोके,प्रकाश डोके,तानाजी डोके,नागेश निकम,तलाठी बालसाहब शेख ,समाधान वगरे व ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Web Title: Mangalvedha Solapur National Highway New Bridge Start

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..