
-महेश पाटील
सलगर बुद्रुक(जिल्हा सोलापूर) : शेत रस्ता हा शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असणारा विषय. शेत रस्त्याअभावी जमीन पडीक राहणे, शेतीतून उत्पन्न कमी मिळणे तसेच शेत रस्त्यामुळे भावकीमध्ये वादविवाद ही नेहमीची समस्या बनली आहे. यावर उपाय म्हणून मंगळवेढा तालुक्यात 'शेत रस्ता अभियान' राबविणार असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.