
Bus stand thief drops stolen gold on police station steps after being caught in the act
Sakal
मंगळवेढा : येथील बसस्थानकावरून दिवाळी सणासाठी जाणाऱ्या महिलेचे गळ्यातील दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी थेट बस स्थानकावरून पोलीस स्टेशनला नेले असता काही क्षणात पायरीवर सोने टाकून चोराने काढता पाय घेतला. गेल्या काही दिवसापासून बस स्थानकावर चोरट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून पोलीस व परिवहन खाते याकडे दुर्लक्षित करत असल्यामुळे प्रवाशासमोर त्यांच्या गळ्यातील दागिन्याच्या सुरक्षितेचा प्रश्न उभा राहिला.