Devendra Fadnavis
sakal
मंगळवेढा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2014-19 च्या कार्यकाळातील दुष्काळात मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील 210 चारा छावण्याची प्रलंबित 33 कोटीची देयके अद्याप अदा केली नसल्याने त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली. गेली सहा वर्षे बिलाच्या प्रश्नावर सत्ताधारी आमदारांकडून विधिमंडळात प्रश्न उपस्थित केल्यावर लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देत शासन चालढकल करीत आहे. त्यामुळे त्यांनीच सुरू केलेल्या छावण्याची बिले त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये दिवाळीपूर्वी अदा करावीत अशी मागणी होत आहे