Congress Protest: दिल्लीतील लाठीहल्याच्या निषेधार्थ मंगळवेढ्यात काँग्रेसचे आंदोलन

Congress Stages Protest in Mangalwedha: मंगळवेढा काँग्रेसचे आंदोलनअंतर्गत दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आंदोलन करत निवेदन दिले.
Congress Protest

Congress Protest

esakal

Updated on

हुकूम मुलाणी

मंगळवेढा: नीट परीक्षेतील पेपरफुटी घोळास जबाबदार धरून केद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी कॉक्रोज जनता पार्टीच्या जंतर मंतर येथे करण्यात आलेल्या आंदोलनावर पोलिसांनी विद्यार्थ्यावर अमानुष केलेल्या लाठीहल्ल्याचा मंगळवेढा काँग्रेस कमिटीच्या वतीने दामाजी चौकात निषेध करून या संदर्भात पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रशांत साळे शहराध्यक्ष अॅड राहुल घुले राज्यसचिव अॅड रविकिरण कोळेकर ज्ञानेश्वर सुर्डीकर राजकुमार मेतकुटे इसाक शेख रवींद्र शिवशरण सत्तार इनामदार बापूसाहेब अवघडे सुनीता अवघडे साधू कांबळे संदीप पवार राजू ठेंगील यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com