Solapur Drought 2026: मंगळवेढ्यात तीन अधिकाऱ्याच्या निगराणीखाली पंचनामे

Mangalwedha Crop Damage, Panchanama, 81 Villages. मंगळवेढा तालुक्यात खरीप २०२६ मधील बाधित शेतीपिकांचे पंचनामे सुरू झाले आहेत. शहरासह ८१ गावांतील पंचनाम्यांसाठी १२५ क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, तीन अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली काम सुरू आहे.
Mangalwedha crop damage panchnama

Crop damage panchanama begins across 81 villages in Mangalwedha under the supervision of three officers

esakal

Updated on: 

मंगळवेढा: तालुक्यातील दुष्काळाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे जलद व पारदर्शक होवून शेतकऱ्यांच्या अडीअडचणींचे निवारण करण्याच्या दृष्टीने शहरासह 81 गावाची जबाबदारी तीन अधिकाऱ्यावर सोपवली.

तालुक्यातील खरीप २०२६ मधील बाधित शेतीपिकांच्या पंचनाम्याचे आदेश निर्गमित करण्यात आले असून, प्रत्यक्ष पंचनामे सुरू करण्यात आले.पंचनामा करण्यासाठी तालुक्यातील सर्व महसुली मंडळातील प्रत्येक गावासाठी स्वतंत्र ग्रामस्तरीय पंचनामा समिती नेमण्यात आली. या समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहायक कृषी अधिकारी यांचा समावेश असून सदर समिती प्रत्यक्ष बांधावर जाऊन संयुक्त पंचनामा करणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com