Mangalwedha Drought: पिकं जळाली, चारा विकतचा; शेतकऱ्यांनी जगायचं कसं? ; पाहणी दौरे नकोत, शेतकऱ्यांच्या बांधावर थेट मदत पोहोचवा!

Mangalwedha Drought, Central Team Inspects Crop Damage and Fodder Shortage : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात केंद्रीय पथकाने दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले
Central Team Inspects Drought-Hit Villages and Crop Damage in Mangalwedha, Solapur

Central Team Inspects Drought-Hit Villages and Crop Damage in Mangalwedha, Solapur

esakal

Updated on: 

मंगळवेढा: यंदाच्या दुष्काळात तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या चार महिन्यापासून विकतचा चारा घ्यावा लागत आहे अशात प्रशासनाने मात्र दोन महिने पूर्ण चारा असल्याचा अहवाल दिला त्यात पुन्हा आज केंद्रीय पथकाने त्याचा अहवाल देण्यासाठी एक महिन्याची मुदत सांगितल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यातून प्रशासकीय उपायोजनाच्या अंमलबजावणी बाबत तीव्र संताप व्यक्त केला.

मंगळवेढा तालुक्यामध्ये नदीकाठ आणि कालवा क्षेत्र सोडले तर पूर्ण परिसर हा दुष्काळाशी सामना करावा लागत आहे जून महिन्यामध्ये पाऊस झाला तर जनावरांना रानातील हिरवे गवत देखील खाण्यास उपलब्ध होते मात्र यंदा पावसाने पूर्णपणे हुलकावणी दिल्यामुळे जून महिन्यापासून शेतकऱ्यांना विकतचा चारा घ्यावा लागत आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com