

Drought Crisis
esakal
मंगळवेढा :- दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून चाऱ्याची मोठी टंचाई असल्यामुळे शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी भटकंती सुरू आहे.अशा परिस्थितीत सरकारी उपाययोजना तोकड्या असल्यामुळे खुपसंगीतील ग्राम दैवताच्या यात्रेतील रांगोळी स्पर्धेत पाऊस पडेना, सरकार मदत करेना, कामसिध्दा तूच आता आधार आहे. अशी भावनिक साद जयश्री वावरे या विद्यार्थिनींनी घातली.