
मंगळवेढा : सध्याच्या काळात डी.जे.चा दणदणाट आणि पाश्चात संगीताच्या आहारी तरुणाई गेल्यामुळे त्याच्या शरीरावर अनेक विपरीत परिणाम होत आहेत. यामुळे मंगळवेढा शहरातील मुस्लिम बांधवांनी येणारी पैगंबर जयंती ही डी.जे मुक्त साजरी करण्याचा निर्णय घेतला. शहरातील गैबी पीर दर्गा येथे पैगंबर जयंतीच्या निमित्ताने बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.