नगरपालिकेत अनियमित्ता आढळल्यास उमेदवारी अर्ज भरणार नाही - अजित जगताप

दामाजी कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर अजित जगताप कारखाना कार्यस्थळावर पत्रकारांशी बोलत होते.
Ajit Jagtap
Ajit JagtapSakal
Updated on: 
Summary

दामाजी कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर अजित जगताप कारखाना कार्यस्थळावर पत्रकारांशी बोलत होते.

मंगळवेढा - नगरपालिकेच्या पाच वर्षाच्या काळात कोठ्यावधी रुपयाचा निधी आणून विकास कामे केली. असून नगरपालिकेत आम्ही केलेल्या कामकाजाची विशेष लेखापरीक्षक नेमून चौकशी करावी. त्यामध्ये अनियमितता आढळल्यास नगरपालिकेच्या निवडणुकीत अर्ज भरणार नसल्याचे पक्षनेते अजित जगताप यांनी सांगितले

दामाजी कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर ते कारखाना कार्यस्थळावर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, दामाजी कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी सत्ताधारी गटावर विशेष लेखापरीक्षक निकाळजे यांच्या अहवालाचा आधार धरून मी सत्ताधाऱ्यावर आरोप केले. कारखान्यावरील कर्ज साखर विक्री भविष्य निर्वाह निधीची रक्कम हे विषय त्यामध्ये होते. मात्र, सत्ताधाऱ्यातील काहींनी नगरपालिकेच्या कामात गैरप्रकार केल्याचा आरोप आमच्यावर केला आहे.

नगरपालिकेच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मी व थेट नगराध्यक्ष असलेल्या अरुणा माळी यांनी सुरुवातीच्या काळात विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून व नंतरच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून नगरपालिकेला कोट्यावधीचा निधी आणून ती कामे केली आहेत. सदरची कामे नियमाला अनुसरून केली. तरीदेखील नगरपालिकेतील कामातील गैरप्रकार काढायला सुरूवात केली. म्हणून मी सत्ताधाऱ्यावर आरोप करीत असल्याचा आरोप प्रचारादरम्यान माझ्यावर केला होता.

सत्ताधारी गटावर मी कारखान्यावर कर्जा संदर्भात केलेला आरोप कार्यकारी संचालकच्या अधिकृत आकडेवारीनुसार तो 198 कोटीच्या आसपास आहे. उलट मी प्रचारादरम्यान केलेले आरोप हे खरे निघाले आहेत. समविचारी गटाच्या माध्यमातून कारखान्यावर सत्ता स्थापन केल्यानंतर आता समविचारी गटाचा मोर्चा नगरपालिकेकडे वळविला असल्याचे जगताप यांनी अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
netaji khandagale and kiran jamdade
Central Team Inspects Drought-Hit Villages and Crop Damage in Mangalwedha, Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com