Solapur Crime : मंगळवेढा पोलिसांची महामार्गावर तपासणी; मद्य, बोलेरोसह  6 लाख 43 हजार 880 चा ऐवज हस्तगत

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मंगळवेढ्याच्या सिमेवरील पोलिसांच्या तपासणी नाक्यावर 6 लाख 43 हजार 880 रुपयांच्या बेकायदेशीर दारूसह वाहन जप्त केले.
mangalwedha police seized alchol worth rs 6 lakh crime lok sabha election mission
mangalwedha police seized alchol worth rs 6 lakh crime lok sabha election missionSakal

मंगळवेढा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मंगळवेढ्याच्या सिमेवरील पोलिसांच्या तपासणी नाक्यावर 6 लाख 43 हजार 880 रुपयांच्या बेकायदेशीर दारूसह वाहन जप्त केले.

तर पोलीस उपनिरीक्षक सलिम शेख यांना धक्काबुक्की करून शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आरोपी प्रकाश चुडाप्पा शिंदे,शरद मारुती मस्के, स्वप्निल शरद मस्के (रा. सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्याद पोहेकॉ सैफुल अब्दुल रसिद अन्सारी यांनी दिली, चाळीस धोंडा येथे मंगळवेढा पोलीस एस.एस.टी. पॉईट जवळ येणारी व जाणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असताना ,यातील आरोपी नामे प्रकाश चुडाप्पा शिंदे यांने आपले ताब्यातील बोलेरो क्रमांक एम.एच.45 ए.एल.8417 हा गाडीत वेगवेगळ्या प्रकारच्या इंग्लिश दारूच्या 1 लाख 53 हजार 880 रुपयाच्या बाटल्याचे बॉक्स विनापरवाना अवैधरित्या

शिवाय गाडीतुन घेवून जात असताना ,पोसई शेख यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने,हाताने धक्काबुकी करुन ढकलुन देवुन शासकीय कामात अडथळा करुन तेथुन बोलेरो गाडी घेवुन हायवे रोडने विरुध्द बाजुने पळुन गेले.

पोलिसाच्या पथकाने त्यास पाठलाग करुन सांगोला शहरातील धनगर गल्ली येथे सांगोला पोलीस व मंगळवेढा पोलीस यांच्या पथकाने पकडले ,वरील तिघा आरोपी विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला, बेदरकारपणे वाहन चालविणे व अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे, गुन्हातील बोलेरो जीप जप्त करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक रणजीत माने, पोसई सलीम शेख, पोहेकॉ सैफन अन्सारी, पोहेकॉ दिंगबर गेजगे, पोकॉ संतोष चव्हाण, चापोकॉ राजाराम तानगावडे यांच्या टिमने केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे करीत आहे.

इन्पेरिअल ब्लु कंपनीच्या 180 मिलीच्या 160 रुपयेच्या 96 बाटल्या किंमत 15360, रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 मिलीच्या 180 रुपयेच्या 120 बाटल्या किंमत 21600, मॅकडॉल नंबर 1 व्हिस्की कंपनीच्या 180 मिलीच्या 150 रुपयेच्या 144 बाटल्या 21600, टु बर्ग कंपनीची बिअर 650 मिलीच्या 190 रुपयेच्या 48 बाटल्या 9120,

किंगफिशर कंपनीची बिअर 650 मिलीच्या 190 रुपयेच्या 12 बाटल्या 2280,देशी दारु संत्रा कंपनीच्या 180 मिलीच्या प्रत्येकी 70 रुपयेच्या 672 काचेच्या बाटल्या 47040,देशी दारु संत्रा आयकॅप कंपनीच्या 180 मिलीच्या 70 रुपयेच्या 384 प्लॉस्टीक बाटल्या 26880, पाढऱ्या रंगाची महिद्रा कंपनीची 5 सिटर बोलेरो एम.एच.45 ए.एल. 8417 किमत 5 लाख असा 6 लाख 43 हजार 880 ऐवज हस्तगत केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com