

Knowledge Over Wealth Slabs: Collecting 10,816 Notebooks to Help Underprivileged Rural Students
Sakal
मंगळवेढा : समाजात लग्न असो वा गृहप्रवेश,अशा समारंभांमध्ये मानापमान आणि महागडे आहेर देण्याची मोठी प्रथा आहे. मात्र, या रूढी-परंपरांना छेद देत मंगळवेढ्यातील एका उच्चशिक्षित प्राध्यापक पती पत्नीने सामाजिक बांधिलकीचे एक आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. आपल्या नवीन घराच्या वास्तुशांती समारंभाला येणाऱ्या पाहुण्यांकडून कोणताही आर्थिक किंवा वस्तूचा आहेर न स्वीकारता, फक्त शालेय वह्यांचा आहेर स्वीकारण्याचा अनोखा निर्णय या प्रा. विनायक कलुबर्मे व ज्योती कलुबर्मे कुटुंबीयांनी घेतला. यामध्ये जमा झालेल्या 10 हजार 816 वह्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात येणार आहेत. सामाजिक जाणिवेतून कौतुकास्पद निर्णय ठरला अनोख्या आग्रहामुळे वास्तुशांतीच्या निमित्ताने हजारो दर्जेदार वह्या जमा झाल्या.