Mangalwedha : जमिनीमध्ये पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये; तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे

कृषी दिनानिमित्त कृषी विभाग व पंचायत समिती मंगळवेढा यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृह येथे कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताह समारोप दिन उत्साहात संपन्न झाला.
Mangalwedha : जमिनीमध्ये पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये; तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे

Mangalwedha - यंदाच्या खरीप हंगामात योग्य नियोजन केले होते मात्र पाऊस लांबल्यामुळे जमिनीमध्ये पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी केले.

Mangalwedha : जमिनीमध्ये पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये; तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे
Solapur News : संगेवाडी गाव तसं चांगलं, पण कर्मचाऱ्यांविना टांगल!

कृषी दिनानिमित्त कृषी विभाग व पंचायत समिती मंगळवेढा यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृह येथे कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताह समारोप दिन उत्साहात संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कृषी अधिकारी विनायक तवटे, बाळासाहेब बाबर, अश्विनी शिंत्रे, बालाजी टेकाळे,कृषी विस्ताराधिकारी मधुकिरण डोरले, तसेच सर्व कृषी पर्यवेक्षक , सर्व कृषी सहाय्यक व बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.

Mangalwedha : जमिनीमध्ये पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये; तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे
Mumbai : मुंबईतील पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली! राष्ट्रीय उद्यानाला ४ दिवसांत ६ हजार नागरिकांची भेट

तत्पुर्वी कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमे पूजन करण्यात आले.त्यानंतर कृषी अधिकारी पंचायत समिती बाळासाहेब बाबर व कृषी पर्यवेक्षक अमोल भोरकडे यांनी कै वसंतराव नाईक यांचा जीवनपट सांगत केलेले कार्याबद्दल माहिती दिली. कृषी अधिकारी अश्विनी शिंत्रे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.

Mangalwedha : जमिनीमध्ये पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये; तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे
Solapur News : सोलापूर शहरात १२ अतिधोकादायक इमारती

मंडळ कृषी अधिकारी बालाजी टेकाळे यांनी खरीप हंगामातील पीक लागवड तंत्रज्ञान बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक मंगेश लासुरकर यांनी वसंतराव नाईक यांच्या कृषी विषयक कार्याबद्दल माहिती दिली.

कृषीसहाय्यक प्रशांत काटे यांनी बीज प्रक्रिया, हुमणी नियंत्रण प्रात्यक्षिक, बियाणे उगवण क्षमता चाचणी ,व लागवड तंत्र पंचसूत्री बाबत मार्गदर्शन केले.राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकरी विश्वनाथ पाटील यांनी कृषी विभागाच्या सल्ला व मार्गदर्शनानुसारच तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे मी अधिक उत्पादन घेऊ शकलो असे मत व्यक्त केले.

Mangalwedha : जमिनीमध्ये पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये; तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे
Solapur News : सोलापूर शहरात १२ अतिधोकादायक इमारती

तालुका शेतकरी सल्ला समिती सदस्य संगमेश्वर केदार यांनी कृषी विभागाच्या मदतीने शेतकऱ्यांनीं नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली. राज्यस्तर पुरस्कार प्राप्त विश्वनाथ पाटील (मुंडेवाडी),भारत मुंगसे(बोराळे), तसेच जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकरी सिद्धेश्वर मेटकरी (पाटकळ),रमेश कमते(सोड्डी),भगवान गावडे(उचेठाण) तसेच तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त नवनाथ सुरकुंडे,विमल चौगुले(खडकी),

Mangalwedha : जमिनीमध्ये पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये; तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे
Mumbai News : आली लहर केला कहर! पठ्ठ्याने ट्रक थेट समुद्रातच घुसवला

ज्ञानेश्वर गरंडे(नंदेश्वर),दत्तात्रय व्हणुटगी(सिद्धापूर),गजानन पाटील (धर्मगाव) त्याबरोबरच महिला शेतकरी साधना भिसे (हजापूर)तसेच जिल्हा शेतकरी सल्ला समिती सदस्य जनार्दन कोंडूभैरी, तालुका शेतकरी सल्ला समितीचे संगमेश्वर केदार, पत्रकार दत्तात्रय नवत्रे त्याचबरोबर कृषी विभागांमध्ये कार्यरत असलेले उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचारी आदींचा सन्मान करण्यात आला.तालुका कृषी अधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले प्रास्ताविक विनायक तवटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत काटे यांनी तर आभार विक्रम सावजी यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com