
मंगळवेढा : गावगाड्यातील मिनी मंत्रालय असलेल्या ग्रामपंचायतीच्या 79 गावाच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत आज तहसीलदार मदन जाधव यांनी जाहीर केली. त्यामध्ये अनेक इच्छुकांना या आरक्षणाचा फटका बसला, या आरक्षण सोडती दरम्यान काही गावात त्या प्रवर्गाचे लोक वास्तव्यास नसल्यामुळे त्यांनी सोडतीवर नाराजी व्यक्त केली. नव्या सोडतील अनेक गावात फेर बदल झाला.