Mangalwedha : सत्ता असूनही न्याय मिळत नसल्याची शिवसेना जिल्हा उपप्रमुखाची तक्रार

या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे आले असता त्यांना शासकीय विश्रामगृहात भेट घेत या मागण्याचे निवेदन देण्यात आले त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात देशातील सर्वात मोठा घोटाळा झाला असून वळण कामात प्रत्यक्ष जमिनीची मोजणी न करता तब्बल 170 कोटी मोबदला बोगस वाटप केलेला आहे,
Solapur
Solapursakal

Mangalwedha - येथील प्रांत कार्यालयातील लाच प्रकरणासंदर्भात शेतकऱ्याकडून महसूल प्रशासनाने केलेल्या पिळनूवणीची संदर्भात दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्याकडे 15 व महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे 54 निवेदन देऊन देखील याची दखल घेतली नसल्याची तक्रार दस्तुर खुद्द शिवसेना जिल्हा उपप्रमुख संजय गेजगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करत सत्ता असून न्यायासाठी झगडावे लागत असल्याचा घरचा आहेर देत १० जूले रोजी आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा दिला.

Solapur
Solapur: KCR यांची ती खेळी अन् काँग्रेसला फटका; अडगळीत पडलेल्या नेत्यांना 'BRS'चा आधार, वाचा राजकीय गणित

या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे आले असता त्यांना शासकीय विश्रामगृहात भेट घेत या मागण्याचे निवेदन देण्यात आले त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात देशातील सर्वात मोठा घोटाळा झाला असून वळण कामात प्रत्यक्ष जमिनीची मोजणी न करता तब्बल 170 कोटी मोबदला बोगस वाटप केलेला आहे,

जुनोनी ता. सांगोला येथील लक्ष्मीबाई बोधगिरे या जिवंत असताना त्यांना मयत दाखवत यांच्या जमिनीचा मोबदला दुसऱ्यांना वाटप केला.सांगोला येथील ६५६ मधील बहिण भावाचा हिस्सा असताना फक्त भावाच्या वारसांना वाटप केले आहे.बहिणीच्या वारसांनी टक्केवारी न दिल्याने त्यांना मोबदला दिला नाही.

Solapur
Mumbai News : भरतीसाठी वेळकाढू भूमिका; स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा आरोग्यमंत्र्यांवर आरोप

जुनोनी गट ५६९ हि जमीन बाधित नसताना त्यांना नोटीसा काढून मोबदला देण्यात आला.वंचित लोकाच्या मोबदल्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार केली असता तात्काळ कारवाईचे आदेश दिल्यानंतर त्या पत्राला चुकीचे व दिशाभूल करणारे उत्तर दिले. मंगळवेड्यातील शारदा भीमराव होवाळे या महिलेचा बाधित होऊनही अद्याप कुठलाही मोबदला मिळाला नाही. कमलापूर येथील जमीन गट क्रमांक 461/१ मध्ये हि जमीन शासनाने भूसंपादन करून 24 लोकांना वाटप केली आहे.

Solapur
Mumbai : हातात पिस्तुल घेऊन परिसरात फिरत असतानाच ; दुसऱ्या हातात पडल्या पोलिसांच्या बेड्या

सदर जमिनीवर इतर व्यक्तीने कब्जा केला असून सदर जमीन वाटपकेल्याप्रमाणे त्या बेघरांना मिळावी.या प्रकरणात ज्या मागणीची चौकशी केली ती चौकशी तपास यंत्रणांनी केली नाही.अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी रास्ता रोको आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घातले असल्याचे या निवेदनात नमूद केले.

मुख्यमंत्र्यांच्या शिवसेने गटाच्या उपजिल्हाप्रमुखांना न्याय मिळत नसल्याने पुन्हा त्यांच्याकडे न्याय मागण्याची वेळ आल्याने आश्चर्य व्यक्त केले दरम्यान या प्रकरणात महसूल विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही. लाच प्रकरणातून चर्चेत आलेले मंगळवेढ्याचे प्रांत कार्यालय पुन्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुखाच्या तक्रारीमुळे पुन्हा चर्चेत आले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com