

Water Supply Disrupted in 45 Villages of Mangalwedha
esakal
मंगळवेढा :- भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची एक मोटर जळाल्याने व खंडित विजपुरवठ्यामुळे कालपासून 45 गावातील 58 टँकरच्या खेपेला पाणी उपलब्ध न झाल्याने वाडीवस्तीवरील नागरिकासह जनावराचे हाल सुरू आहे.पावसाने हुलकावणीने तालुक्यातील भूजल पातळी खालावली अशा परिस्थितीत जवळपास 45 गावाला 55 नागरिकांना व तीन जनावरांसाठी टँकरने पुरवले जात आहे. त्यामधील आंधळगाव, गणेशवाडी;कचरेवाडी, लेंडवे चिंचाळे, लक्ष्मी दहिवडी ही गावे शिरभावी योजनेवर आहेत.इतर या भागातील बहुतांश गावाचे टँकर हे रड्डे आणि चिक्कलगी (भुयार) जुनोनी या ठिकाणाहून भरले जातात.