अखेर भोंदू मनोहरमामा करमाळा पोलिसांच्या ताब्यात!
अखेर भोंदू मनोहरमामा करमाळा पोलिसांच्या ताब्यात!sakal

अखेर भोंदू मनोहरमामा करमाळा पोलिसांच्या ताब्यात!

करमाळ्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी मनोहर भोसले यास ताब्यात घेतले

करमाळा : उंदरगाव (ता.करमाळा) येथील मनोहरमामा भोसले यास बारामती पोलिसांकडुन करमाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. करमाळ्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी मनोहर भोसले यास ताब्यात घेतले असून, बारामती होऊन ते करमाळ्याकडे रवाना झाले असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. दरम्यान, मनोहर भोसले यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता  हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले असल्याचेही सांगण्यात येत आहे.

करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील अटकेत असलेल्या भोसलेला बारामती पोलिसांनी रविवारी (ता. 19) न्यायालयासमोर हजर केले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला भोसलेचा सहकारी ओंकार शिंदे याला बारामती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संत श्री बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी भोसलेवर बारामती पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. त्याला बारामती पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तो पोलिस कोठडीत होता. पोलिस कोठडी संपल्यानंतर आज रविवारी ता.19 त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते.

भोसलेवर करमाळा पोलिसातही बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. आज त्याला करमाळा पोलिसांकडे देण्यात आले आहे, अशी माहिती मिळत आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे व पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाने करमाळा पोलिसांचे पथकही त्याला आणण्यासाठी बारामतीला गेले होते

भोसलेला सातारा जिल्ह्यातील सालपे येथील एका फार्म हाऊसवर बारामती पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती. बारामती तालुक्यातील शशिकांत सुभाष खऱात यांनी मनोहर भोसले यानी फसवणूक केली असल्याची फिर्याद दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. तर त्याच दिवशी करमाळा पोलिसातही एका महिलेच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांत करमाळा पोलिसांनी बारामती पोलिसांकडून मनोहर भोसलेला ताब्यात घेतले आहे. याचबरोबर दुसरा संशयित आरोपी  ओंकार शिंदेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com